Ad will apear here
Next
‘आक्का, मी आणि....’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन
इंदिरा संत यांच्याविषयी वीणा संत यांनी लिहिलेले पुस्तक
पुणे : ‘महाराष्ट्र शारदा’ म्हणून ज्ञात असलेल्या प्रख्यात कवयित्री इंदिरा संत यांच्या सहवासातील आठवणींवर त्यांच्या स्नुषा वीणा संत यांनी लिहिलेल्या ‘आक्का, मी आणि....’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या रविवारी, दि. ११ ऑगस्ट २०१९ रोजी ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांच्या हस्ते होणार आहे. 

हे पुस्तक बुकगंगा पब्लिकेशन्सने प्रकाशित केले आहे. सर परशुरामभाऊ (एस. पी.) महाविद्यालयाच्या दृक्श्राव्य सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता हा प्रकाशन सोहळा होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून ‘झी २४ तास’चे मुख्य संपादक विजय कुवळेकर उपस्थित राहणार आहेत. या वेळी ‘बुकगंगा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर, संचालक सुप्रिया लिमये आणि गौरी बापट उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाविषयी :
‘आक्का, मी आणि....’  पुस्तकाचे प्रकाशन 
ठिकाण : दृक्श्राव्य सभागृह,  एस. पी. कॉलेज
वेळ : सायंकाळी ५.३० वाजता
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZXCCD
Similar Posts
‘आक्का, मी आणि ....’ म्हणजे इंदिरा संतांना जाणून घेण्यासाठी नवा दस्तऐवज पुणे : कवयित्री इंदिरा संत यांच्या स्नुषा वीणा रवींद्र संत यांनी ३५ वर्षांच्या सहवासात त्यांना उमजलेल्या इंदिराबाईंचे व्यक्तिमत्त्व ‘आक्का, मी आणि...’ या पुस्तकाद्वारे शब्दबद्ध केले आहे. पुण्यात ११ ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे आणि ज्येष्ठ
सुनेच्या लेखणीतून उभे राहिले इंदिरा संतांचे व्यक्तिमत्त्व बेळगाव : कवयित्री इंदिरा संत यांच्या स्नुषा वीणा रवींद्र संत यांनी ३५ वर्षांच्या सहवासात त्यांना उमजलेल्या इंदिराबाईंचे व्यक्तिमत्त्व ‘आक्का, मी आणि...’ या पुस्तकाद्वारे शब्दबद्ध केले आहे. इंदिरा संत यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला या पुस्तकाचे बेळगावमध्ये प्रकाशन झाले. ‘बुकगंगा पब्लिकेशन्स’ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे
आक्का, मी आणि... ‘आक्का, मी आणि... ’ या पुस्तकाचा अल्प परिचय...
हवा असा थाटमाट असे गूज लिहायाला... चार जानेवारी हा कवयित्री इंदिरा संत यांचा जन्मदिन. प्रसिद्ध कवयित्री, कर्तृत्ववान स्त्री, गृहिणी, आदी भूमिकांतील इंदिरा संत यांचे साधे आणि सखोल व्यक्तिमत्त्व त्यांच्या धाकट्या सूनबाई वीणा संत यांनी ‘आक्का, मी आणि... ’ या पुस्तकामधून उलगडून दाखविले आहे. सासूबाई म्हणून, आजी म्हणून, घरातली मोठी व्यक्ती

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language